
सोलापूर: अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
बातमी थोडक्यात
जंकारनगरमध्ये अवैध देशी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर आरोपी उफरान उर्फ पापिया मुनीर गोळडवाड याच्यावर कारवाई केली. या कारवाईत ५० हजार रुपयांची पिस्तूल जप्त करण्यात आली असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी पाटोळे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.