प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

भाजपच्या पुण्याच्या पदवीधर मतदार संघासाठी डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

'पुढारी'च्या संचालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपकुलपती डॉ. स्मितादेवी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना पुणे विधान परिषद पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीने सातारा शहर व जिल्ह्यात उत्साह निर्माण झाला असून शिवतीर्थ येथे भाजपचे पदाधिकारी व स्थानिकांनी जल्लोष केला. आता त्यांना निवडून देण्याची जबाबदारी खासदार छत्रपती शिवाजी उदयनराजे भोसले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा