
वरोरा भाजपाकडून फेसबुकवर केलेल्या कमेंट्सवर कायदेशीर कारवाईची मागणी
बातमी थोडक्यात
भाजपा आमदार करण संजय देवतळे यांच्या फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट्स आल्यानंतर वरोरामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा शहराध्यक्ष संतोष सुरेश पवार यांनी पोलीस तक्रार दाखल करून जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच फेसबुक अकाउंटचा माग काढुन पुढील कमेंट्सचा प्रसार रोखण्याची मागणी भाजपाने पोलिसांकडे केली आहे.