
खिल्लारे फार्म हाऊस जवळ विहिरीत आई आणि मुलाचा मृतदेह सापडला
बातमी थोडक्यात
खिल्लारे फार्म हाऊस जवळ विहिरीत मनीषा काशिंकर आणि मुलगा मंदार काशिंकर यांचा मृतदेह सापडला. विहिरीत मनीषाचा मृतदेह तरंगताना आढळला, तर मंदारचा मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुडून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.