
रशियन महिलेच्या अवैध वास्तव्यामुळे कोरगावमध्ये पोलिसांची कारवाई
बातमी थोडक्यात
वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात वास्तव्य करणाऱ्या ३३ वर्षीय रशियन महिला तायसा सोकोलोवा विरोधात पेडणे पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ च्या कलम ३(१) सोबत २३अ आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आदित्य मुकुंद गाड यांनी राज्य शासनाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सुरू आहे.