
५ ऑक्टोबरला आटपाडीत शेतकऱ्यांचा मोर्चा
बातमी थोडक्यात
आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेतून तळ्यांमध्ये पाणी न आल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. पाणी संघर्ष चालवलीतर्फे ५ ऑक्टोबरला आटपाडी बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत असून माजी आमदारांच्या उपस्थितीत हा मोर्चा होणार आहे. सरकारने ठोस पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.