
खोट्या अत्याचार प्रकरणी मंगळवेढा बंद
बातमी थोडक्यात
मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व जाती व धर्माच्या नागरिकांनी अनिता कालुंगे यांच्या विरोधात खोटा अत्याचार दाखल केल्याने मंगळवेढा शहरात व तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला. प्रमुख बाजारपेठा व व्यापारी आस्थापना बंद असल्याने जनजीवन व व्यापार विस्कळीत झाला, परंतु आमदार समाधान आवताडे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.