नवरात्र तयारी: मंदिर स्वच्छता मोहीम सुरू
बातमी थोडक्यात
नवरात्रपूर्व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने अंबाबाई मंदिर व परिसरातील स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नवीन मंडप उभारण्यात आला असून, या मंडपाच्या माध्यमातून लाखो भाविकांना ऊन व पावसापासून संरक्षण मिळणार आहे. या मोहिमेत अत्याधुनिक उपकरणांचा वापर तसेच मंदिराच्या वास्तू व मूर्तींची दुरुस्ती करण्यात येणार आहे.