
ट्रिगर-1 अंतर्गत चिकलठाण व दोनागाव येथे पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू
बातमी थोडक्यात
जून महिन्यापासूनच्या पावसाच्या कमतरतेमुळे चिकलठाण व दोनागाव परिसरात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. तहसीलदार सारिका भगत यांनी शेतांची पाहणी केली. ३३ टक्क्यांहून अधिक शेत बाधित झाल्याचे अहवालात दिसून आले. ग्राम समित्यांकडून शेतकऱ्यांची यादी तयार करून जीपीएस फोटो अंतिम मुदतीत सादर करण्यात येत आहेत.