
सिंधुदुर्ग मध्ये एआय स्मार्ट शेती प्रकल्प सुरू
बातमी थोडक्यात
आंब्याच्या आणि काजूच्या पिकांवर होणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांवर उपाय शोधण्यासाठी सिंधुदुर्ग मध्ये 'एआय' आधारित 'स्मार्ट शेती' चा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. शेतीचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात आठ तालुक्यांतील ४०० शेतकरी सहभागी होणार आहेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी हा प्रकल्प दोन वर्षांत पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे.