
पाटण तालुका दुष्काळग्रस्त यादीत येऊ शकतो
बातमी थोडक्यात
पाटण तालुक्यातील १४ पैकी ९ महसूल मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाटण तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत आणण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई प्रयत्न करत आहेत. देसाईंच्या प्रयत्नानंतर शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून आजपासून पीक सर्वेक्षण आणि पाहणी सुरू करण्यात आली आहे. १९ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करायचा की नाही, याबाबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार असून पाटणला दुष्काळमुक्त होण्याची शक्यता आहे.