
श्रद्धा शृंगारपुरे यांना मोखाडा येथील डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार
बातमी थोडक्यात
मोखाडा येथील दुर्गम भागात कार्यरत श्रद्धा शृंगारपुरे यांना सामाजिक कार्यासाठी डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वराज फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रद्धा शृंगारपुरे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नीळवसंत मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.