
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आठ आळंदी विद्यार्थ्यांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले, तर शुक्रवारी आळंदीच्या स्मशानभूमीत चार विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेने आळंदी व केळगाव परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे.