
ठाणे सायबर फसवणूक: सायबर हल्ल्यात 4.53 कोटींचा गंडा
बातमी थोडक्यात
ठाणेकरांची सायबर फसवणुकीत पाच पोलिस ठाण्यांतून 4.53 कोटींची फसवणूक. ठाणे सायबर विभागाने 1.25 कोटी रुपये वसूल केले असून 4 हजार 218 व्यवहारांचे 2.45 कोटी रुपये परत येणे बाकी आहे. वीज खंडित करण्याची धमकी, बनावट केवायसी अपडेट यांसारख्या फसवणुकीच्या युक्त्या वापरल्या जात आहेत.