
राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत विवान बाळांडेला कांस्य पदक
बातमी थोडक्यात
फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील विवान भाऊसाहेब बाळांडे याने १४ व्या मिनी व ८ व्या बाल राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. त्याच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रातली प्रतिष्ठा वाढली आहे. विवान हा बोरगाव अर्ज गावचा खेळातील राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणारा पहिला विद्यार्थी आहे.