
अभिजात मराठी भाषा अभ्यास उत्कृष्टता केंद्राला पुणे येथे मंजुरी
बातमी थोडक्यात
अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने अभिजात मराठी भाषा अभ्यास उत्कृष्टता केंद्राला पुणे येथे मंजुरी दिली. या निर्णयामुळे देश-विदेशातील मराठी भाषकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी राज्य सरकार आता या केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणार आहे.