
पालघरमध्ये वादळामुळे ३०० घरांचे नुकसान
बातमी थोडक्यात
पालघर आणि विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचे छप्पर उडून जाणे, झाडे उन्मळून पडणे यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मनोर, सावरखंड या गावांना सर्वाधिक फटका बसला असून वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. महसूल विभागाकडून गावागावातील नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.