
तरण तारण सीमेवर झालेल्या चकमकीत दोन घुसखोर ठार
बातमी थोडक्यात
तरण तारणमध्ये राजोके गावाजवळून पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन घुसखोरांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तींना इशारा दिला, पण ते सीमेकडेच निघाले, त्यामुळे बीएसएफने गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणांकडून मृतांबद्दल अधिक माहिती मिळणे बाकी आहे.