
बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाला मिठी नदी घोटाळ्यात अटक
बातमी थोडक्यात
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात मुंबई महापालिकेचे सुमारे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाशी संबंधित २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील व्यवहारांची चौकशी सुरू आहे.