
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक
बातमी थोडक्यात
प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री पाच जणांनी गोळ्या झाडून आणि चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना अलिबाग जवळच्या एका डेअरीमधून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वाडापाव विक्रेत्याने गोळ्या झाडल्या होत्या.