
ठाणे: प्रदीप पूर्णेकर हल्ल्यात दोघांना अटक
बातमी थोडक्यात
अलिबाग जवळच्या एका डेअरीवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. पूर्णेकर यांच्या ऑफिस जवळ वडापावची गाडी चालवणारा निखिल यादव आणि नितेश पवार या कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आली. प्रदीप पूर्णेकर यांच्यावरील हल्ल्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात टेहळणी केल्याचा तपास सुरू केला आहे. चौकशीत उर्वरित आरोपींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.