
एल निनोच्या धोक्याने पुण्यात पाणीटंचाईची तयारी
बातमी थोडक्यात
एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे पुणे महापालिकेने सिंचन विभागाकडे २०२६-२७ साठी २१.३४ टीएमसी पाणी नियोजित करण्याची मागणी केली आहे. २०१७ व २०२१ मध्ये अनुक्रमे ११ व २३ गावे जोडल्या गेल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवूनही सिंचन विभागाकडून प्रतिसाद न आल्याने पाणी बजेट नियोजनाला विलंब होत आहे.