
महसूल मंत्री अकोल्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार
बातमी थोडक्यात
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार रोजी अकोला व बाळापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पंचनामा प्रक्रियेचा आढावा घेण्यासह शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १० या वेळेत शेतकरी त्यांच्या समस्या मांडणार आहेत.