
भुई परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव
बातमी थोडक्यात
भुई परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला असून आजूबाजूच्या परिसरात २५० संशयित रुग्ण आहेत. परतीच्या पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांनी ताप किंवा डेंग्यूची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.