
टॅक्सी चालकाला धमकी देणाऱ्या गुंडाला पुणे पोलिसांनी अटक केली
बातमी थोडक्यात
शिवाजीनगरमध्ये एका टॅक्सी चालकाला धमकी देणारा शेख पोलिसांची टोपी घालून चालकाची चावी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये शेख हा पोलीस नसून गुंड असल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे पुणे पोलिसांवर विनाकारण टीका झाली.