
चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी उद्घाटनाचा कार्यक्रम
बातमी थोडक्यात
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने झाली. मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील या संस्थेची भूमिका अधोरेखित करताना संस्थेचा पाच दशकांचा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आला. तसेच कॉफी टेबल बुक आणि नियतकालिक प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमात विविध निर्मिती संस्थांचा गौरव करण्यात आला.