
दुष्काळात कर्ज वसुली निलंबनाची धाराशिव काँग्रेसची मागणी
बातमी थोडक्यात
दुष्काळात शेतकरी, मजुरांचे आर्थिक हाल पाहता कर्ज वसुली निलंबनाची मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेसने केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेश राजेंनिंबाळकर यांनी निवेदन देऊन तातडीने दिलासा देण्याची मागणी केली आहे. दुष्काळग्रस्त समाजावरील भार हलका करण्यासाठी बँका, फायनान्स कंपन्यांना सूचना द्या, अशी प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे.