
नागपूर एमडी जप्त; आरोपी ताब्यात
बातमी थोडक्यात
अमली पदार्थ विक्रीच्या संशयावरून नागपूर पोलिसांनी अब्दुल शिराज अब्दुल गफर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ११.१६ ग्रॅम एमडी आणि ४४ हजार ९८० रुपये रोख जप्त केले आहेत. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल असून एनडीपीएस कायद्याच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. फरार असलेल्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.