
जळगावच्या कर अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा
बातमी थोडक्यात
जळगावचे आयकर अधिकारी सतीशकुमार भदाणी यांना लाच घेतल्याप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. भदाणी यांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून पैशांची मागणी केल्याची तक्रार पाटील यांनी सीबीआयकडे केली होती. सीबीआयने भदाणी यांच्या कार्यालयात सापळा रचला असता ४० हजार रुपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले.