
आगीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना लुथ्रा बंधूंकडून १५ लाख रुपयांची मदत
बातमी थोडक्यात
हाडफळे बिर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबचे मालक लुथ्रा बंधूंनी ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या आगीत बळी गेलेल्या २५ जणांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे ठरवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर हप्त्यांमध्ये देण्याची ही भरपाई ठरवण्यात आली आहे. पुढील सुनावणी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.