
कन्नड तालुक्यात पाणीटंचाईवर तातडीची बैठक
बातमी थोडक्यात
कन्नड तालुक्यात पाणीटंचाईवर तातडीची आढावा बैठक झाली. आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रशासनाला संभाव्य संकटाबाबत इशारा देण्यात आला. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली असून पाऊस न झाल्यास नोव्हेंबरपर्यंत २३ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीपुरवठा अभियंता कांबळे यांनी संभाव्य टंचाईबाबत गावनिहाय अहवाल सादर केला.