
गणेशपूर मंदिरातील चांदीचे दागिने चोरीला
बातमी थोडक्यात
कन्नड तालुक्यातील गणेशपूर मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने घुसून गणपतीच्या मूर्तीतील २ लाख २० हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. या चोरीमुळे गणेशपूर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पिशोर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.