
दुष्काळामुळे ४३ तालुक्यात बांधकाम थांबले
बातमी थोडक्यात
दुष्काळ वाढत असल्यामुळे राज्य सरकारने ४३ तालुक्यात बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना पाणी व चारा मिळण्यास प्राधान्य देण्यात येणार असून पंपचा वीजपुरवठा बंद करणे व सीएसआर निधीचे वाटप करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्यात येणार आहे. उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.