
मुंबई महापालिकेचे फिल्म सिटीला २०. ०८ कोटी रुपये भाडे २०१९ पर्यंत
बातमी थोडक्यात
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पामुळे फिल्म सिटीला २०. ०८ कोटी रुपये भाडे २०१९ पर्यंत मिळणार आहे. मुंबई महापालिका पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणारा रस्ता बांधत असून त्यात फिल्म सिटी ते खिंडीपाडा अहमदनगर मुलुंड या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे. फिल्म सिटीने तीन ठिकाणी सुमारे ३ लाख ९० हजार चौरस फूट जागा या प्रकल्पासाठी दिली असून या जागेचे भाडे दररोज ८ पैसे ते ५२ पैसे प्रति चौरस फूट याप्रमाणे ठरवले आहे. हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे.