
स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा रौप्यमहोत्सवी प्रदर्शनात मांडला
बातमी थोडक्यात
हुतात्मा स्मारकावर १ ते ३ ऑक्टोबर या काळात 'स्पंदने स्वातंत्र्याची' या नावाने छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक गटांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्याना त्यांच्या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती ऐतिहासिक छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना आणण्याचे आमंत्रण शाळांना देण्यात आले आहे.