
कोल्हापूर: स्वतःच्या घरात चोरी केल्याप्रकरणी तरुणास अटक
बातमी थोडक्यात
शाकंभरी कॉलनीतील स्वतःच्या घरातून १० लाख ३२ हजार रुपये रोख रक्कम आणि ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी यश सुनील बंडगर या उच्चशिक्षित तरुणास अटक करण्यात आली. सोमवारी सकाळी झालेल्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासांत उलगडला. बंडगर हा चोरी केलेले सोने लक्षतीर्थ येथील मंदिराच्या जवळ विक्री करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. अमलादार शुभम संकपाळ, युवराज पाटील आणि समीर कांबळे यांनी सापळा रचून केलेल्या झडतीमध्ये चोरीचा माल जप्त करण्यात आला.