
मोशी रुग्णालयाचे बांधकाम ६५ टक्के पूर्ण
बातमी थोडक्यात
मौजे मोशी येथे निर्माणाधीन असलेल्या नऊ मजली, ७०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी मोशी रुग्णालयाचे ६५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. आरसीसीचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, आता टाइल्स, इलेक्ट्रिकल केबल्स, पाईप्सचे काम सुरू आहे. दहा किलोमीटरच्या परिघात नागरिकांना स्वस्त दरात वैद्यकीय सेवा देण्याचे उद्दिष्ट या रुग्णालयाचे आहे.