
कुरणमाला येथील माने यांच्या घरी बिबट्याचा शिरकाव
बातमी थोडक्यात
कुरणमाला येथील जयसिंग माने यांच्या पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्याने त्यांच्या घरात शिरकाव केला. माने कुटुंब व शेजाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. परिसरात बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.