
उल्हासनगर : अमली पदार्थांच्या कारवाईत 7. 4 किलो गांजा जप्त
बातमी थोडक्यात
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात हनुमान मंदिराच्या जवळ आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना 7 किलो 400 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली. विक्रीच्या कारवाईबाबत गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून मोबाईल फोन, रोख रक्कमसह 7 हजार 400 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.