
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या बाळाला ४८ तासांत विकले
बातमी थोडक्यात
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या एका महिन्याच्या बाळाला पैशासाठी विकण्यात आले आणि ४८ तासांत ते चार हातातून गेले. बाळाला छत्रपती संभाजीनगरहून नांदेडमार्गे तेलंगणा येथे ५०० किलोमीटरहून अधिक अंतर पार करून नेण्यात आले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन बाळाला बाल कल्याण समितीकडे सोपवले आहे.