
सेवा सदनाकडून ईसापूर रमणा येथील शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी निधी
बातमी थोडक्यात
पीक नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या विठ्ठल वाधवे या शेतकऱ्याच्या दोन मुलांची सेवा सदनाने पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. शरद आणि अंकिता या दोघांचाही शैक्षणिक खर्च सेवा सदनाकडून उचलला जाणार असून त्यांचे शिक्षण विस्कळीत होणार नाही. मीरा कदम यांनी मुलांच्या घरी जाऊन मुलांचे शिक्षण करून त्यांना सक्षम करण्याचे वचन दिल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.