
राहुल फळदेसाई यांनी रस्ता अडवला, गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई यांनी कारने रस्ता अडवून एका ज्येष्ठ नागरिकाला व त्यांच्या कुटुंबियांना अडवले. ॲड. शांताराम वि. कुडचाडकर यांनी राहुल व अन्य तिघांवर कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली. घटनेनंतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.