
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या अशी भाविकांची मागणी
बातमी थोडक्यात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्यावे अशी मागणी करत भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा समितीच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या समाधीस्थानी सुरू झालेल्या आंदोलनाचा समारोप जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देऊन करण्यात आला. २१ ऑक्टोबरला जनआंदोलन करण्याचे ठरले आहे.