
एका दिवसात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
बातमी थोडक्यात
एका दिवसात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोन्याच्या दरात ३ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा दर १ लाख ४८ हजार तर चांदीचा दर २ लाख २५ हजार रुपये प्रति किलो झाल्याने ग्राहक दिलासा व्यक्त करत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक करारामुळे भाव घसरल्याचे सांगितले जात आहे.