
घोटी विभाग संघ सभेत महिला सक्षमीकरणासाठी कृषी आधारित उद्योग निश्चित
बातमी थोडक्यात
सम्यक गती महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, घोटी विभाग संघ यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिला सक्षमीकरणासाठी कृषी आधारित उद्योग चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना कृषी आधारित उद्योग चालविण्याच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.