
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशी एनएसयूआयची मागणी
बातमी थोडक्यात
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशी मागणी एनएसयूआय महाराष्ट्रने केली आहे. कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी, अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी काँग्रेसने निवडणूक लढवावी, असे मत मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महाविकास आघाडीच्या युतीशी चर्चा करून निवडणूक लढविण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा.