
अमरावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावा यासाठी भाविकांचे आंदोलन
बातमी थोडक्यात
ग्रामगीताचार्य मनोहरराव साबळे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावा अशी मागणी भाविकांनी केली. राज्यभर पसरलेल्या या आंदोलनात २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझारी येथे जनसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आले.