
चव्हाण यांची कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
बातमी थोडक्यात
पाऊस न झाल्याने कराड तालुक्यातील परिस्थिती गंभीर झाल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी. राज्य सरकारने अद्याप कराडला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट न केल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. चव्हाण यांनी तातडीने जलसंधारणाची आणि दुष्काळग्रस्त नसलेल्या तालुक्यांचे मंडळनिहाय सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.