
दुष्काळ निवारण कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या महसूलमंत्र्यांनी
बातमी थोडक्यात
दुष्काळ निवारण कामात असलेल्या ११ विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रद्द केल्या. काही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळ निवारण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश दिले. राज्याचा सुमारे ७५ टक्के भाग दुष्काळग्रस्त असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.