
पर्लकोटा पूरानं भामरागड-आलापल्ली रस्ता चौथ्या दिवशी बंद
बातमी थोडक्यात
भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं भामरागड-आलापल्ली रस्ता चौथ्या दिवशीही बंद आहे. प्रशासनाकडून गावात स्वच्छता व आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. पर्लकोटा नदीच्या जुन्या पुलावरून काही पाणी वाहून गेलं असून, बिनागुंडाच्या काही भागात वाहतूक बंद आहे.